सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (१३ ऑगस्ट) : मुकुटबन-पाटण बोरी या २८ कि.मी. रस्ता रुंदीकरण डांबरीकरण चे काम सुरु असून, त्या रस्ता बांधकामाकरिता रस्ता केद्रिय विकास निधीअंतर्गत ८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ह्या रस्त्याचे कॉन्ट्रक्ट ओबेराय कन्ट्रक्शन कंपनीकडे आहे. सदर कंपनीने भरलेल्या टेंडर डिझाइन नुसार आणि इस्टीमेट नुसार बनविला गेला नाही. त्यामुळे अल्पावधित रोडवर असंख्य ठिकाणी डांबर उखळून मोठाले खड्डे पडले आहे. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाकडे तक्रारी करूनही आधिकारी अर्थिक देवाण घेवाण पोटी कामाचा दर्जा आतिशय वाईट असतांनाही कारवाही केलेली नाही. त्यामुळे विरोधात पाटण येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या कामाची गुणवत्ता तपासण्या साठी चौकशी समिति नेमण्यात यावी. त्या समितीचे अध्यक्ष पद मा. तुकाराम मुंडे साहेब यांच्या कडे देण्यात यावे. तसेच पाटण ते लिंगटी पर्यंतचा रोड नव्याने करण्यात यावा. अशी मागणीआंदोलन कर्त्यानी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संदीप बुर्रेवार सभापती कृ.उ.बा. समिती झरी यांनी केले असून आंदोलन स्थळी मा.वामनराव कासावार माजी आमदार वणी, राहुल दांडेकर, भगवान चुकलवार, प्रकाश कसावार, रामन्ना येल्टीवर, ढाले सर भूमारेड्डी बाजनलावार, नाकले सर, विठ्ठल जिड्डेवार, शेखर बोनगीरवार, प्रदिप बेलखडे, अनिल राऊत, भोयर सर, मिथून सोयाम राकेश गालेवार, गंगाधर बोळकुठवार, रमेश संगसवार दिपक कांबळे यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
८४ कोटी च्या २९ कि.मी. निकृष्ठ रस्ता बांधकामा विरोधात रस्तारोको आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 13, 2021
Rating:
