मिनी बसस्थानक बांधकामासाठी निधी देण्याची काँग्रेस कमिटीची मागणी


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (१३ ऑगस्ट) : मारेगाव शहरात उभारण्यात येणाऱ्या मिनी बस स्टॅन्डसाठी सन २०१९ मध्ये लाखों रुपये खर्च करून २७४० चौ.मी. ची जागा खरेदी करण्यात आली. परंतु निधीअभावी गेल्या दोन वर्षांपासून 'बस स्टॅन्ड'चे बांधकाम रखडले आहे. यासाठी रॉयल्टी खनिजमधून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात जिल्हा महासचिव रमण डोये यांनी जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे केली आहे.
शहरात प्रवाशांना उभे राहण्यासाठी बस स्टॅन्ड बांधावे, यासाठी अनेकदा आंदोलनेही केली. सन २०२१ मध्ये वणी यवतमाळ मार्गालागत महसूल विभागाची जागा बस स्थानकासाठी जागाही खरेदी करण्यात आली. परंतु बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने मागील दोन वर्षापासून बांधकामाचा प्रश्न प्रलंबित आहे. माजी आमदार वामनराव कासावार, मारेगाव बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, जिल्हा महासचिव रमण डोये, यांनी दिलेल्या निवेदनातून 'बस स्टॅन्ड'साठी खनिज रॉयल्टी मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मिनी बसस्थानक बांधकामासाठी निधी देण्याची काँग्रेस कमिटीची मागणी मिनी बसस्थानक बांधकामासाठी निधी देण्याची काँग्रेस कमिटीची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.