कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा - कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (१२ ऑगस्ट) : कोतवाल हा जिल्हाधिकार्यालय ते गाव पातळीवरचे सर्व काम करीत असतो, इंग्रज काळापासून कोतवाल हे पद अस्तित्वात आले आहे.
जिल्हाधिकार्यालय ते गाव पातळीवरील कोतवाल हे सर्व कामे करत असतात. चौकीदार, हमाल, पहारेकरी, गावात दवंडी देणे व निवडणूक काळातील लावलेले सर्व प्रकारची कामे करणे, गाव पातळीवर महसूल गोळा करताना तलाठी साहेबांना मदत करणे, शासनाच्या अनेक योजनांचे गावात जाऊन जनते पर्यंत पोहोचविणे तसेच गौन खनिज ची माहिती वरिष्ठांना देणे दुष्काळग्रस्त भागात तलठी साहेबांना पहाणी पंचनामे करताना मदत करणे, गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवणे तसेच पोलीस प्रशासनाला मदत करणे, पोलीस पाटील यांना सहकार्य करणे, कोतवालाकडुन अनेक कामे करुन घेतल्या जातात परंतु आजपर्यंत कोतवालांना समाधानकारक वेतन दिले जात नाही म्हणून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी समाविष्ट करा. या प्रमुख मागणीसाठी बिलोली कोतवाल संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व तसेच  कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनात अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट पंधरा हजार रुपये वेतन देणे, कोतवालांना तलाठी पद भरती मध्ये ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, कोरोनाने मयत झालेल्या कोतवालांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे, सेवानिवृत्तीनंतर कोतवालांना कुठलाही शासकीय लाभ मिळत नाही कारणाने सेवानिवृत्तीनंतर कोतवालास दहा लाख रुपये रक्कम निर्वाह भत्ता म्हणून देण्यात यावे. इत्यादी मागण्याचे निवेदन बिलोलीचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी बिलोली कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष माधव सुरेशराव कांबळे, उपाध्यक्ष ऐलकुंचे माधव, सचिव शिवराज मुंडकर, कार्याध्यक्ष सतीश गंगोणे प्रसिद्धीप्रमुख माधव रेणेवाड, श्रीरामे राजू, वाघमारे हणमंत, साईनाथ आमेटवार, राहुल संदीप वाघमारे, कांबळे, भुरे वैशाली, मीनाक्षी स्वामी, ठक्के सुरेखा ,लक्ष्मी नाईक, रामलु कानगुलवार, सायलु मामीलवाड, शिवराज लघुळे इत्यादींची उपस्थिती होती. 
कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा - कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा - कोतवाल संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.