सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
पांढरकवडा, (२२ ऑगस्ट) : शिवराया क्लबचे पूर्व क्रिकेटर तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अनिरुद्ध बडवे यांचे वयाच्या 43 व्या वर्षी दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले. समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर होते तर, अनेक गरजवंतांना ते मदतीचा हात त्यांनी दिला. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजाराशी झुंजत असतांना काल दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री पावणे आठच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत राहत्या घरी मालवली.
या दरम्यान, अनिरुद्ध बडवे यांचेवर नागपूर येथे उपचार सुरु होते. त्यांच्यामागे एक मुलगा, पत्नी, आई वडील व भावंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. येथील स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निघालेल्या अंत्ययात्रेत बराच मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. मुलाने चिताग्नी दिल्यानंतर शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर भाऊ तिवारी राज्यमंत्री दर्जा यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव वासुदेव शेंद्रे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर, व तालुका पत्रकार संघाचे दामोदर बाजोरिया यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणातून किशोर तिवारी यांनी अनिरुद्ध बडवे या युवा कार्यकर्त्यावर प्रकाश टाकून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या तर, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आपला पक्ष एका सच्च्या कार्यकर्त्याला मुकला अशा भावना व्यक्त करून अनिरुद्ध बडवे यांच्या परिवाराच्या पाठीशी सदैव राहू असे ते म्हणाले.
यावेळी रा.स्व.संघाचे विष्णुपंत पाटील हे देखील शोकसभेला उपस्थित होते. शांतीपाठ भाजपाचे सुनील भाऊ बोकीलवार यांनी घेतला व श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर ,माजी नगराध्यक्ष शंकर बडे, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल बोरेले, माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पुरोहित, माजी न.प. सदस्य मनोज भोयर, माजी भाजयुमो जिल्हाप्रमुख श्रीराम मिलकेवार, विद्यमान नगराध्यक्ष सौ.वैशाली ताई नहाते, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय तोडासे, माजी पंचायत समिती सदस्य रितेश भाऊ परचाके, भाजपा तालुका विभाग प्रमुख आनंद वैद्य, यासह अनेक मान्यवरांनी घरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
अनिरुद्ध बडवे यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 22, 2021
Rating:
