बुरांडा येथील युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२२ ऑगस्ट) : दांडगाव येथील घटना ताजी असतांना तालुक्यातील गोंड बुरांडा येथील २५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली असून, त्याला चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते.

प्रवीण श्रीराम शेंद्रे रा. गोंड बुरांडा असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने शुक्रवार २० ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान, स्वगृही विष प्राशन केले होते. त्याच वेळी त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. दोन दिवस उपचार घेत असतांना आज मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण यांच्या पश्चात वडील आई, दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.

मारेगाव तालुक्यात आत्महत्या च्या घटनेत सतत वाढ होतांना दिसत आहे. कारणे काही ही असली परंतु  तालुक्यात युवक, युवा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या विषयाकडे शासन प्रशासनाने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.


बुरांडा येथील युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू बुरांडा येथील युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on August 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.