इसमाची गळफास लावून आत्महत्या


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
झरी (२२ ऑगस्ट) : दि. २१ आगस्ट रोजी झरीतील राहत असेल्या दिलिप बाहीरवार वय ४१ इसमाने आपल्या राहत्या घरी फाट्याला शेला बांधून गळफास लावून आमहत्या केली. .ही घटना पाच वाजता उघडकीस आली त्यावेळी त्याची पत्नी शेत मुजूरी करीता गेली होती.

मृतक दिलीप हा एका पायाने अपंग असून, तो झरीतील प्रगती बारवर नौकर असून काल तो घरीच होता. त्याच्या घरकुलाचे बांधकाम सुरु असून, आर्थिक विवंचनेतून त्याने हे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

घटना स्थळाचा पंचनामा करून आज ११ वा. शवविच्छेदन व २ वा. अंत्यसंकार करण्यात आले.  पुढील तपास पाटण पोलीस करीत आहे.
इसमाची गळफास लावून आत्महत्या इसमाची गळफास लावून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on August 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.