"सहज सुचलं" महिला व्यासपीठाच्या अधिवक्ता ॲड. कविता माेहरकर यांचा काेराेना याेध्दा म्हणून सत्कार!


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर , (१७ ऑगस्ट) : अतिदुर्गम भाग म्हणून गणल्या जाणां-या गडचिराेलीत महाराष्ट्रातील नामवंत महिला व्यासपीठाच्या सदस्या अधिवक्ता कविता माेहरकर व त्यांचे सहकाऱ्यांनी कोविड महासंकटात व कोविड  बाधित रुग्णांना भोजन डब्बे पाेहचविण्यांचे कार्य केले. या साेबतच गडचिराेली शहरात काेराेना आजाराने मृत्यू  पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम ॲड. कविता माेहरकर यांनी स्वतः केले आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान माेलाचे ठरले आहे. रविवार दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी गडचिराेली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री राजेन्द्र पाटील येड्रावकर यांचे प्रमुख उपस्थितीत काेराेना याेध्दा हे विशेष सन्मानपत्र देवून ॲड. कविता माेहरकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित हाेती.

ॲड. माेहरकर ह्या नामवंत "सहज सुचलं" कला ग्रुपच्या जेष्ठ सदस्या व मार्गदर्शिका असुन, त्यांनी आज पावेताे विविध साैंदर्य स्पर्धेत भाग घेवून बरीच पारिताेषिके व सन्मानपत्रे मिळवून स्वता: साेबत गडचिराेली जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे. दरम्यान, त्यांचे या भरीव कार्याची विदर्भीय सुपरिचित लेखिका ॲड.मेघा धाेटे (राजुरा), उपराजधानी नागपूरच्या याेग शिक्षिका मायाताई काेसरे, नृत्य कला पुरस्कार विजेता नागपूरच्या प्रभा अगडे, गडचिराेलीच्या नामवंत कवयित्री मालती सेमले, मुंबईच्या समाजसेविका श्रुती उरानकर, भाग्यश्री सानप, रजनी रनदिवे, नागपूर मनपाच्या भूतपूर्व नगर सेविका नयना झाडे, हैद्राबादच्या जेष्ठ कांदबरीकार विजया तत्ववादी, पथ्राेडच्या पुरस्कार विजेता जेष्ठ लेखिका विजया भांगे, सहज सुचलं व्यासपीठाच्या चंद्रपूर निवेदिका सिमा पाटील, गडचिराेलीच्या गीता हिंगे, दिलशाद पिरानी यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूरच्या शहर संघटिका वंदना हातगांवकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, क्रीडापटु सायली टाेपकर, राजूऱ्याच्या संजिवनी धांडे, अल्का सदावर्ते, सविता भाेयर, सराेज हिवरे, अरुणा गावूत्रे, प्रतीक्षा झाडे, श्रध्दा हिवरे, सुविधा चांदेकर, शंकरपूरच्या वर्षा शेंडे, नेरीच्या ज्याेति मेहरकुरे, माया नन्नावरे, वराे-याच्या रसिका ढाेणे, वंदना आगलावे, मुलच्या प्रतिमा नंदेश्वर, वंदना आगरकाठे, चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे, श्रुती कांबळे, वंदना मुनघाटे, वर्धेच्या भारती मैदपवार, शाेभा राेकडे, अमरावतीच्या सपना राजगुरे, महिला पत्रकार रुतुजा साेनावणे, माधुरी कटकलवार, धनश्री शेंडे, धनश्री पांडव, पुनम जांभुळे, सुवर्णा कुळमेथे, सुवर्णा लाेखंडे, पायल आमटे, प्रतिभा चट्टे, प्रतीक्षा मैदपवार, शिवानी नन्नावरे, तळाेधीच्या ज्याेति इंगळे, सहज सुचलं व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका सुविधा बांबाेडे, सुपरिचित जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्रि कु.अर्चना सुतार, नागपूरच्या डॉ. स्मिता मेहेत्रे,पुनम काेसरे, कविता रेवतकर, दुर्गापूरच्या कविता चाफले, पुनम रामटेके, गडचिराेलीच्या उज्वला यामावार, मनिषा मडावी, कवयित्रि मेघा भांडारकर, अनुपमा मुंजे, कु.कल्याणी सराेदे, शितल काेसे यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले.
"सहज सुचलं" महिला व्यासपीठाच्या अधिवक्ता ॲड. कविता माेहरकर यांचा काेराेना याेध्दा म्हणून सत्कार! "सहज सुचलं" महिला व्यासपीठाच्या अधिवक्ता ॲड. कविता माेहरकर यांचा काेराेना याेध्दा म्हणून सत्कार! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.