सह्याद्री न्यूज नेटवर्क |
केळापूर, (२१ ऑगस्ट) : पांढरकवडा येथे दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी पंचायत समिती पांढरकवडा सभागृहात आ. डॉ.संदीप भाऊ धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांकडून गावाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती राजूभाऊ पसलावार, माजी उपसभापती संतोष बोडेवार, पंचायत समिती सदस्य शिलाताई गेडाम तसेच गटविकास अधिकारी चव्हाण साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी रेड्डीवार साहेब, विस्तार अधिकारी चव्हाण साहेब, कुळसंगे साहेब व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, पंचायत समिती अधिनस्त कर्मचारी तसेच ऋतिक पाटील, स्वप्नील मिसेवार, अतुल बेले इत्यादीची उपस्थिती होती.
आमदार डॉ. संदीप भाऊ दुर्वे यांनी घेतला ग्राम'सचिवांच्या कामाचा आढावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 21, 2021
Rating:
