टॉप बातम्या

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा शॉक लागून आईचा मृत्यू


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (२१ ऑगस्ट) : महागाव तालुक्यातील बोथा शिवरात विजेचा शॉक लागून २६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी तसेच दोन गाई व एक श्वानही‌ दगावल्याची घटना बुधवारी घडली.

सुनिता सुनील मोरे असे मृत महिलेचे नाव आहे. माणिक चंपत मोरे यांच्या शेतालगत रोहण सुनील मोरे (९) हा मुलगा गाई चारत होता. अचानक गाय खाली कोसळली व जोराने हंबरडली. जवळच रोहणची आई सुनीता मोरे ही काम करीत होती. तीने मुलाकडे धाव घेऊन जिवंत विद्युत तारा बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, विजेचा प्रवाहामुळे आईचा पुसद येथील मेडीकेअर रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले तर,मुलगा रोहण हा रूग्णालयात भरती आहे.

या शिवाय दो गाय व एक श्वानही दगावले. अशी माहिती नायब तहसीलदार डाॅ.संतोष आदमुलवाड यांनी दिली.
Previous Post Next Post