सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (२४ ऑगस्ट) : पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे यांच्या कारभारावर सभागृहातील पंचायत समिती सदस्यांसह काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दुखावल्याने सभापतीवर अविश्वासाचे सावट घोंगावत असल्याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे.
पंचायत समिती सभापती व उपसभापती चे निवडीच्या वेळेस काँग्रेसने खुल्या वर्गासाठी सुटलेल्या असलेल्या पदासाठी मराठाभिमुख चेहरा म्हणून पंचायत समिती सदस्य बालु आगलावे यांचे नाव समोर केले होते परंतु काँग्रेसमधील माजी आमदार विजय खडसे यांचा मुलगा प्रज्ञा खडसेनी महाविकास आघाडी व काँग्रेससोबतच बंडखोरी करून देशात विरोधात असलेल्या भाजपाशी हातमिळवणी करून सभापतिपद मिळवले.
पंचायत समिती सभापती पद बंडखोरी करून मिळवल्यानंतर काँग्रेसमधील स्थानिक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटले की, भविष्यात सर्व काही आलबेल होईल व लोकांची मने जिंकली जातील असा त्यावेळी अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी अनुभवला भेटली असेल चर्चा ऐकायला मिळत आहे. यामध्ये मुख्यतः ग्रामसेवकाला बोलून १५ वा वित्त आयोग व १४ वा वित्त आयोगाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे, ठेकेदारांना केबिनच्या एका कर्मचारी मार्फत बोलवुन घेणे "मला भेटलाच नाही भेटायला सांग" हे वाक्य पंचायत समिती वर्तुळात चांगलेच रंगलेले आहे. याशिवाय ग्रामसेवकाच्या पंचायत समितीचे इतर कर्मचार्यांच्या तक्रारी करत राहणे त्यांना केबिन ना बोलून घेणे व दमदाटी करण्याचे अनेक प्रकार काँग्रेस पक्षाच्या नेत्या पर्यंत पोहोचलेले आहेत. यासोबतच सभागृहामध्ये विरोधामध्ये असलेल्या पंचायत समिती सदस्यांच्या विरोधात सुडाचे राजकारण करण्याचे प्रकार सुद्धा समोर आले आहे. फक्त या सर्व प्रकाराला सभागृहातील पदाधिकारी, पंचायत समितीचे ठेकेदार, ग्रामपंचायत सरपंच व सचिव, काही वैयक्तिक लाभाचे लाभार्थी व पंचायत समितीचे कर्मचारी त्रासून गेलेले आहेत. ह्या सर्व तक्रारी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्याकडे गेल्या तेव्हा तालुक्यातील या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एका केबिनला बैठक घेऊन पंचायत समिती सभापती अविश्वास दाखल करण्याची चर्चा झाली असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
या सर्व प्रकाराचा उद्रेक १८ जुलै रोजी झालेल्या पंचायत समिती सभागृहामध्ये आढावा बैठकीमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनसामान्यात खराब होत असल्याची चर्चा सामान्य नागरिकाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. म्हणून विशेषता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याकडे लक्ष देऊन सभापती पदावर अविश्वासाच्या हालचाली चालु केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात पंचायत समिती सभापती खडसेवर अविश्वास दाखल होतो की काय ? व दाखल झाल्यास कितपत यश येते ? हे आगामी काळात दिसूनच येईल.
खुर्ची वाचवण्यासाठी खासदाराची भेट
पंचायत समिती सभापती पदावर अविश्वास दाखल करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा कानावर येताच पंचायत समिती सभापती प्रज्ञा खडसे व माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर हे दोघांनी खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली असुन स्थानिक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखल करू नये यासाठी वरिष्ठ स्तरावरून जोरदार फिल्डींग लावली असल्याची चर्चा आहे.
पंचायत समिती सभापतीवर अविश्वासाचे सावट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 24, 2021
Rating:
