सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४ ऑगस्ट) : चंद्रपूरातील स्थानिक इंडस्ट्रिअल परिसरातील मूळ रहिवाशी असलेल्या तारा नारायण आत्राम यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खाेब्रागडे) आदिवासी समाज भाईचारा समिती चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा पदी एकमताने निवड करण्यांत आली आहे. त्यांचे या निवडीचे चंद्रपूर सह जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी व सदस्यगणांनी अभिनंदन केले आहे.
आपल्यावर साेपविलेली जबाबदारी आपण इमाने इकबारे पार पाडु असे मनाेगत नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तारा आत्राम यांनी आज (मंगळवारला) सह्याद्री न्यूज पाेर्टलशी बाेलतांना चंद्रपूर मुक्कामी व्यक्त केले. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान या पूर्वी माेलाचे ठरले आहे.
दरम्यान त्यांचे या नियुक्तीचे चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष राजू मडावी (आदिवासी समाज भाईचारा समिती रि.पा.इं. खाेब्रागडे) सामाजिक कार्यकर्ता मंगामी बुरांडे, ताराबाई भाेयर, निखिल संसारीवार, रवीन्द्र खेडेकर, माेहन लाेनगाडगे, नितेश बाेरकुटे, शिलरतन गावंडे, राजू मून, तुळशिराम घुटके, विजय कवाडे, रमेश काेवले, गाेपाळ चौधरी, सुरेश बन्साेड, व मायाबाई रामटेके यांनी स्वागत केले आहे.
तारा आत्राम यांचे नियुक्तीचे केले अनेकांनी अभिनंदन !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 24, 2021
Rating:
