सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (०३ ऑगस्ट) : कोविड -19 या विषाणूमुळे सारे जग टाळेबंदीच्या गर्तेत अडकले आहे. समाजाच्या आजच्या आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक देश आणि तेथील विविध विषयांचे तज्ञ् आपापल्या भूमिका मांडत आहे. यात उद्योग, कृषी, आरोग्य आणि शिक्षण यावर मोठया प्रमाणावर भाष्य होताना दिसून येत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावातून पडताना शिक्षण आणि भविष्यकालीन गुंतवणूकीबाबत विशेषतः ऑनलाईन शिक्षण हे महत्वपूर्ण ठरत आहे. जीएमआर वरोरा एनर्जी लि. व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन यांच्या माध्यमातून 'मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन' या मध्ये विनामूल्य प्रशिक्षण युवकांना दिल्या जात आहे. त्याचप्रमाणे युवती करिता 'असिस्टंट ब्युटी थेरेपिष्ट' चे प्रशिक्षण सुद्धा ऑनलाईन पद्धतीने देणे सुरु आहे.
नुकतेच मोबाईल प्रशिक्षणाची पाचवी व ब्युटी थेरेपिष्ट च्या दुसऱ्या बॅच चे आभासी उदघाटन कार्यक्रम 20 जुलै 2021 ला संपन्न झाला असून, सदर प्रशिक्षणात ब्युटी पार्लर 30 आणि मोबाईल 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उदघाटक म्हणून जीएमआर वरोरा एनर्जी लि.चे श्री. विनायक पेंढारकर, श्री. मुकुल बोगावर, सुश्री. यशश्री बालपांडे, व वरलक्ष्मी फाउंडेशन चे श्री. सुनील कुमार विश्वकर्मा उपस्थित होते.
आजचे युग मोबाईल चे युग असल्याने युवकांना सदर प्रशिक्षणास उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. प्रशिक्षणात व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, व्यवहार ज्ञान, व्यवसायाशी जोडण्याकरिता विविध प्रकारचे गेस्ट व्याख्यान सोबतच विविध विषयांचे थेअरी व प्रॅक्टिकल घेतल्या जात असून, युवक व युवतीना स्वयंरोजगाराचे ऑनलाईन प्रशिक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून देण्यात येत आहे.
जीएमआर वरोरा एनर्जी लि. व जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन मागील 10 वर्षांपासून उपजीविका या विषयांवर काम करत आहे. ज्यांचे शिक्षण 10 ते 12 पर्यंत झालेले आहे अशा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराशी जोडण्याचे काम फाउंडेशन च्या माध्यमातून एप्रिल 2013 पासून तालुक्यामध्ये प्रशिक्षण सुरु आहे. मार्च 2019 पर्यंत, सदर प्रशिक्षणामध्ये मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन' व होम अप्लाईन्स
,असिस्टंट ब्युटी थेरेपिष्ट या कोर्स अंतर्गत 650 पेक्षा जास्त युवक युवतीना प्रशिक्षण करण्यात आले. यामधील 300 पेक्षा जास्त युवायुवतीना रोजगार व स्वयंरोजगाराशी जोडण्यात आले आहे. या माध्यमातून दरमहा 300 हुन अधिक तरुण 5000 ते 7000 रुपये कमवत आहेत. ले लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देऊन 92 युवकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले असून, 48 युवकांनी लॉकडाऊनच्या काळात स्वयंरोजगार सुरु केला आहे. स्वतःला व परिवाराला आर्थिक सहयोग करून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.
बेरोजगार तरुणांना कोरोनाच्या संकटातही रोजगाराची आशा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
