रक्ताचा तुडवडा भरून काढण्यासाठी विसापूरात रक्तदान शिबिर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
बल्लारपूर, (२७ ऑगस्ट) : कोरोना प्रतिबंध लस घेण्याचे प्रमाण वाढल्याने लस घेतल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नसल्याने;जिल्ह्यात रक्ताचा अभूतपूर्व तुडवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी खारीचा वाटा का असोना;तो उचलावा या प्रामाणिक उद्देशाने; जागतिक छायाचित्र दिनानिमित्य बल्लारपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, महावितरण विभाग बल्लारशाह, व सलग ४० वेळा रक्तदान करणारे संजय वानखेडे यांच्या वाढ दिवसानिमित्त संजय भाऊ वानखेडे मित्रपरिवार यांच्या माध्यमातून विसापूरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामजिक बांधिलकी जोपासली होती.
   
या प्रसंगी सलग दहा वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला होता. तसेच ज्येष्ठ फोटोग्राफर आनंद गोंगले, सुनील साठे, सतिश गडकर, वामन राजूरकर व संजय वानखेडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ता अजय वैरागडे, उद्घाटक बल्लारपूर शहराचे नगर अध्यक्ष हरीश शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त प्रा. शाम धोपटे, सामाजिक कार्यकर्ता राजू झोडे, बल्लारपूर नगरसेवक सिक्की उर्फ विनोद यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष रेड्डी यांनी केली तर संचालन विवेक गडकर व आभार प्रदर्शन संजय बोरकर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत पुणेकर, स्वप्निल सोनटक्के, आकाश पाझारे, प्रथम दुपारे, सचिन पुणेकर, आशिष तीतरे व गुंजन वानखेडे यांनी अथक परिश्रम घेतले होते.
रक्ताचा तुडवडा भरून काढण्यासाठी विसापूरात रक्तदान शिबिर रक्ताचा तुडवडा भरून काढण्यासाठी विसापूरात रक्तदान शिबिर Reviewed by सह्याद्री चौफेर on August 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.