सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१६ ऑगस्ट) : मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु.) येथील रहिवासी तर सध्या ता. राजापूर मौजा पाचल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले निवृत्ती बापूंना मारकवाड यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात आला.
अंबुलगा नगरीचे भूमिपुत्र असलेले निवृत्ती मारकवाड हे मौजे पाचल ता. राजापूर जि. रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत परिमंडळ कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पित वृत्ती या गुणांची दखल घेऊन अमृत महोत्सवी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.
मुखेड पं. स. चे माजी उपसभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर, शिवाजीराव पाटील अंबुलगेकर, सरपंच सौ. अर्चना रॅपनवाड, सेससो चे चेअरमन सुधीर मामिलवाड, उपसरपंच शरद पाटील, बालाजीराव नागमवाड, प्रा. शिवाजी कांबळे, व्यंकट कल्याणपाड,संजय नागमवाड,रऊफ पठाण, संजय देशटवाड, धोंडिबा झाडे, विठ्ठलराव गुरूजी, बाबू सावकार, बळू पाटील, किशन पाटील पांढरे, भाऊराव पाटील, पद्माकर चल्लावाड, गंगाधर मंत्रे, पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, राजू कांबळे आणि समस्त गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
स्वातंत्र्य दिनी निवृत्ती मारकवाड यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2021
Rating:
