सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१६ ऑगस्ट) : दिनांक १५ ऑगस्ट रोजी मौजा अंजनी येथे कृषी महाविद्यालय नायगाव (बा.) अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक हर्षद दिगांबर पाटील (पारवेकर) यांनी माती परीक्षण, शेणखत गांडूळ खत तसेच सेंद्रिय शेती यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
दिवसेंदिवस आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचे मुख्य कारण म्हणजे, जास्तीत जास्त शेतामध्ये रासायनिक औषधांचा अती वापराने मातीवर होणारे परिणामुळे उत्पन्नात होणारी घट. याचे मुख्य कारण होय तसेच माती परीक्षण ही एक काळाची गरज आहे, हे जाणून शेतकऱ्यांनी माती परीक्षण केंद्र मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करून घ्यावे. यामुळे मातीचा PH (सामू) तसेच सेंद्रिय कर्ब याची पुरेपूर माहिती आपल्याला मिळेल व त्या पद्धतीने मातीला लागणारी पोषक तत्त्व आपण सेंद्रिय पद्धतीने देऊ शकतो. शेती हा एक पूरक व्यवसाय आहे. यामध्ये आपण विविध प्रकारचे योजना आखून शेळी पालन, मत्स्य पालन, शेततळे इत्यादी पासून भरपूर प्रमाणात पैसा कमवू शकतो. असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शनात अंजनी गावचे सरपंच महेश पाटील हांडे, शिवराज पाटील हांडे, गोविंद बद्देवाड, किशन पाटील पांडे, रघुनाथ भरांडे, रामा भरांडे, उत्तम भुसेवाड, शंकर पाटील हांडे, देविदास पाटील, बालाजी धानेकर, तसेच कृषी महाविद्यालय नायगांव चे विद्यार्थी दिपक कांबळे, अनिकेत दंडे, स्वप्नील शिवराज हांडे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते.
अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त अंजनी येथे शेतकर-यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2021
Rating:
