आमदार भीमराव केरामांच्या वाढदिवसानिमित्त गंगूबाई परेकारांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप

सह्याद्री न्यूज  नेटवर्क |
किनवट, (१६ ऑगस्ट) : येथील रामनगर येथे आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा अनुसुचित जमाती तालुकाध्यक्ष गंगुबाई कचरूजी परेकार यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. 
          
यावेळी आमदार भीमराव केराम, प्रमुख पाहुणे म्हणून  सौभाग्यवती मनोरमा भीमराव केराम, भारती महाराज, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, अनिरुद्ध केंद्रे, माहूर भाजपा शहर अध्यक्ष गोपू महामुने, अजय चाडावार, नीलकंठ कातले (प. स. सदस्य) आमदारांचे जनसंपर्क अधिकारी, संतोष मरस्कोल्हे, शिवा क्यातमवार उपस्थित होते.
          
तसेच या कार्यक्रमासाठी वंदना गादेवार, गंगुबाई परेकार, शेख रझिया, कविता गोणारकर, शेख परवीन, मनीषा चौधरी, विद्या पाटील, जयश्री भरणे ह्या महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तामगाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुजा फोले यांनी केले.


आमदार भीमराव केरामांच्या वाढदिवसानिमित्त गंगूबाई परेकारांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप आमदार भीमराव केरामांच्या वाढदिवसानिमित्त गंगूबाई परेकारांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on August 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.