शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०२ ऑगस्ट) : मुकुटबन येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी (ता. 2) ला मुकुटबन येथील बस स्थानकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बेरोजगारांच्या हक्कासाठी झरी तालुक्यातील युवक सर्व युवकवर्ग  एकत्र येऊन या आमरण उपोषणात सहभागी झाले.

झरी तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक नामांकित मोठं मोठ्या कंपन्या आल्या आहे. व त्याचे कामही जोरात चालू आहे मात्र, तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मात्र त्या कंपनीत कुठल्याच प्रकारचे मिळत नाही असा संताप व्यक्त करत, आज तालुक्यातील युवकांनी आमरण उपोषणाला निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग कामासाठी वणवण असून स्थानिक कंपनीच्या कामांपासून वंचित आहे. याआधी तालुक्यातील सर्व युवक एकत्र येऊन येथील कंपनीमध्ये अनेक वेळा कामं मागितले. परंतु त्यांना त्या ठिकाणी कामच मिळत नसल्याचे उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.

तालुक्यात उद्योग,कंपनी तर आहे मात्र, येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कुठलंच काम मिळत नसल्यामुळे आज ही उपोषणाची वेळ आमच्यावर आली. स्थानिकांना काम द्या या मागणीकरिता युवकांनी मुकुटबन येथे आमरण उपोषणाला सुरुवात करताच या उपोषणाला आज शिवक्रांती कामगार संघटनेने प्रथम आपला पाठिबा दिला आहे. यावेळी आम्ही युवकांच्या पाठीशी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगितले.
शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा शिवक्रांती कामगार संघटनेचा युवा बेरोजगार उपोषणाला जाहीर पाठीबा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.