सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नायगाव, (१० ऑगस्ट) : अण्णाभाऊसाठे चौक महात्मा फुले काॅलनी नायगाव (बा) येथील मातंग समाजाची अस्मिता असणारे लाल ध्वज दरवर्षी प्रमाणे १ ऑगष्ट रोजी लावण्यात आला होता. त्या ध्वजासोबत दि.७ ऑगष्ट रोजी बेरात्री नायगाव येथील पोलीस स्टेशन काही कर्मचाऱ्यांनी याबाबत पुर्वसुचना न देता ध्वजासोबत विठंबना करुन ध्वज चुकीच्या पध्दतीने काढल्याने मातंग समाजाची अस्मिता दुखावली. त्यामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करुन तात्काळ निलंबीत करण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून मानवहीत लोकशाही पक्ष नायगावच्या वतीने नायगाव तहसिलदार व पोलीस स्टेशन नायगाव यांना करण्यात आली.
या वेळी गंगाधर कोतेवार सर सामाजीक कार्यकर्ते, नायगांव ता.अध्यक्ष यादव वाघमारे, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुनमभाऊ धमनवाडे, साहेबराव सुर्यकार सामाजिक कार्यकर्ते, मारोती गायकवाड ता.ऊपाध्यक्ष नायगांव, नितिन रोडे सम्यक प्रतिष्ठान नायगांव, गौतम वाघमारे, अनिल हानमंते, राजकुमार सोनकांबळे, मधुकर जवळे पत्रकार, नायगांव ता.सोशल मिडीया अध्यक्ष अक्षयभाऊ बोयाळ सह आदिंची उपस्थिती होती.
लालध्वज काढणार्या पोलीस कर्मचार्यांना तात्काळ निलंबित करा - मानवहीत लोकशाही पक्ष यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 10, 2021
Rating:
