वाकान विस्थापित झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसनाचे काम लागणार मार्गी- पुनर्वसनमंत्र्याचं आश्वासन,

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
यवतमाळ, (१० ऑगस्ट) : काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विजय भाऊ वडेट्टीवार पुनर्वसनमंत्री यांची यवतमाळ येथील विश्रामगृहावर मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांनी भेट घेऊन महागाव तालुक्यातील वाकान येथील दोन दशकापासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या संदर्भाने विधायक चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या भेटीदरम्यान पुनर्वसनमंत्री यांनी हा प्रश्न चालू आर्थिक वर्षामध्ये मार्गी लावू असे, आश्वासन देऊन वाकणे तील विस्थापित झालेल्या पुरग्रस्तांना मोठा दिलासा दिल्याचे मनीष भाऊ जाधव यांनी कळविले आहे. वाकान येथील ९ जुलै २००५ च्या महापुरा मध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांना १७ वर्षापासून मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकप्रतिनिधी व शासन, प्रशासन स्तरावर वेळोवेळी निवेदन उपोषण या लोकशाहीच्या मार्गाने विस्थापित गावकऱ्यांनी केलेल्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्षितपणाचे धोरण ठेवून हेळसांड केली आहे.

कुटुंबाची मूलभूत विकासाकरिता व नागरी सुविधेसाठी अवहेलना होत आहे. पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाला गत १७ वर्षांपासून मरण यातना भोगाव्या लागत आहे. गुंड भर पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक महिलांना जीव मुठीत धोक्यात घेऊन नदी ओलांडून पाणी भरावं लागतं, हे पुरोगामी महाराष्ट्रातील चित्र अतिशय विदारक व काळजाचा ठोका वाढवणारा आहे. स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे हे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे सुद्धा मनीष भाऊ जाधव यांनी पुनर्वसन मंत्री यांच्याकडे खंत व्यक्त करून दाखवले. या चर्चे दरम्यान, मनीष भाऊ यांनी संबंधित मंत्री महोदय साहेबांना आग्रही विनंती करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चालू खरीप हंगाम २०२१ --२२ मध्ये दिनांक --- २४ / ६ / २०२१ ला तीन दिवसात झालेल्या जिल्ह्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस मानामुळे व पुसद तालुक्यातील ब्राह्मणगाव उडदी या मंडळामध्ये ढग फुटी च्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्राचे व शेतमालाचे कधी भरून निघणारे शेतकऱ्यांचे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसान पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टरी एक लाख रुपयाची मदत देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा मंत्री महोदयाकडे मनीष भाऊ जाधव यांनी केली.

या प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाच्या संदर्भाने आदरणीय विजय भाऊ वडेट्टीवार पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत चर्चा करून अती शीघ्रतेने व तातडीने विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसनाचे प्रश्न आपण निकाली काढून या होत असलेल्या विस्थापित कुटुंबाच्या हेळसांड थांबवावी अशी विनंती केली अशी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. या निवेदनाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी प्रलंबित असलेल्या प्रश्नाबद्दल जिल्हाधिकारी कडून वस्तुस्थितीची शहानिशा आढावा घेऊन तातडीने हा प्रश्न येणाऱ्या आर्थिक वर्षात मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने आता हे पुनर्वसनाचे प्रश्न निकाली निघेल असा आशावाद निर्माण झालेला आहे.

या भेटी वेळी डॉ.वजाहत मिर्झा, विधान परिषद आमदार पुसद, आदरणीय विजयराव भाऊ खडसे, माजी आमदार उमरखेड, रमेश भाऊ चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, शरद भाऊ पाटील, सुभाष राठोड, गोकुळ जाधव, उपस्थित होते.

वाकान विस्थापित झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसनाचे काम लागणार मार्गी- पुनर्वसनमंत्र्याचं आश्वासन, वाकान विस्थापित झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसनाचे काम लागणार मार्गी- पुनर्वसनमंत्र्याचं आश्वासन, Reviewed by सह्याद्री चौफेर on August 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.