सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (१० ऑगस्ट) : वार्ड क्र. ६२ सिडको एन-६ संभाजी काॅलनी येथील नागरी वसाहतीमध्ये महाराष्ट्र पब्लिक स्कुलच्या लगत असलेल्या उद्यानामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन शहरातील विविध भागातील मद्यपी, तळीराम तसेच टवाळखोर यांच्या मैफली रंगत आहेत.
विविध भागातून आलेले टवाळखोर हे गुंडप्रवृत्तीचे असुन, यांच्याकडे शस्त्र असतात. या उद्यानामध्ये आलेले नशाखोर हे दारू, गांजा, सिगरेट, व्हाईटनर, स्टीकफास्ट व इतर नशा सर्व प्रकारचे नशा करतात. नशा केल्यानतंर उद्यानामध्ये धिगाना घालणे, आपआपसात भाडणं करणे, आरडाओरड करणे, परिसरातील नागरीकांच्या घरावर दगडफेक करणे, तसेच उद्यान परिसरातील महिला व मुलीची छेड काढणे, तसेच परिसरातील नागरीकांना चाकुचा धाक दाखवुन लूटमार करणे व मारहाण करणे, असे अनेक प्रकार या उद्यानामध्ये दिवसा व रात्री घडत आहेत. परिसरातील नागरीक व बालके उद्यानात गेल्यास टवाळखोराकडून त्यांना छेडठाड व शिवीगाळ होते, या कारणामुळे परिसरातील महीला-मुली, लहान बालके, व वृद्ध व्यक्ती उद्यानात जाण्यासाठी घाबरत आहेत. असाच प्रकार रोज घडत राहीला तर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे उद्यानामध्ये बसणाऱ्या नशेखोरावरती कारवाई करून गुन्हा दाखल करावा तसेच उद्यानामध्ये पोलीसांची दिवसा व रात्री गस्त वाढवावी असे परिसरातील नागरीकांनी सिडको एन-7 पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदनकर्ते मनीष नरवडे, सचिन गायकवाड, यश, पट्टेकर, अभिषेक गावडे, क्षितीज कांबळे, सुमित हिवराळे, आकाश गायकवाड, सचिन दाडगे यावेळी उपस्थित होते.
सिडको एन-६ संभाजी काॅलनीतील उद्यान बनले नशेखोराचा अड्डा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 10, 2021
Rating:
