सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
उमरखेड, (२० ऑगस्ट) : नव्या एफ एम केंद्रासह बंद करण्यात येणारे दूरदर्शन केंद्र तत्काळ सुरु करा, अशी मागणी आ. नामदेव ससाने यांनी दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक यांना केली. मुंबई येथे अतिरिक्त संचालक चंदिला यांची भेट घेवून ही मागणी करण्यात आली आहे.
उमरखेड येथील दूरदर्शन केंद्र बंद करण्यासंदर्भात प्रसार भारतीने नोटिस बजवाली आहे. सदरील केंद्र बंद झाल्यास तालुक्यातील नागरिकांच्या माहिती, प्रसारण आणि मनोरंजनाचे महत्वाचे साधन संपुष्टात येण्याचा धोका उद्भवला आहे. त्या अनुसंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा आणि उमरखेड़ महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार नामदेव ससाने यांनी केंद्र वाचविण्यासाठी थेट केंद्र सरकारकडे घाव घेतली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्याशी संपर्क साधुन दूरदर्शन केंद्र वाचविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेनुसार आ. ससाने यांनी नुकतीच अतिरिक्त संचालक यांची भेट घेवून तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दूरदर्शन केंद्र बंद करु नये, शिवाय नवीन एफ एम केंद्र सुरु करावे. अशी मागणी लावून धरली असून दूरदर्शनच्या अतिरिक्त संचालकांनी त्यांची मागणी गंभीरतेने घेतली असून, लवकरच केंद्र सुरु होईल असा आशावाद जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा यांनी व्यक्त केला आहे.
नव्या एफ एम केंद्रासह तत्काळ दूरदर्शन केंद्र सुरु करा - आ. ससाने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 20, 2021
Rating:
