बक्षिस वितरण समारंभ: महिला प्राधिकरण विचार मंच व महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा "ऑनलाईन स्पर्धा" आयोजित


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
पुणे, (२० ऑगस्ट) :  "नागपंचमी" निमित्त निगडी प्राधिकरण मधील महिलांसाठी ऑनलाईन मेहंदी स्पर्धा व नऊवारी साडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी, से. २४ श्री चिंतामणी गणेश मंदिर काचघर चौक प्राधिकरण येथे संपन्न झाले.

यावेळी बक्षिस वितरण समारंभास प्रमुख उपस्थिती होती, मा.नगरसेविका मा.अश्विनी ताई सचिन चिखले (मराठे), व स्वातंत्र्य विर सावरकर मंडळाच्या कार्याध्यक्षा मा. निवेदिता ताई कच्छवा,  मा.विदुरा ताई देठनकर सचिव, मा.सिमाताई शेलार, माधुरी ताई पाटोळे, शितलताई कदम, शितलताई बैरागी, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, वाॅड अध्यक्ष *प्रसाद मराठे शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी, रुषिकेस कांबळे व अनेक महिला नागरिक उपस्थित होते.
मेहंदी स्पर्धा मध्ये १) पहिला क्रमांक, सौ. संध्या कुंभार. २) दुसरा क्रमांक, सौ.पिंकी मित्तल, ३) तिसरा क्रमांक कु.प्रज्ञा देठनकर, तसेच नऊवारी साडी स्पर्धा मध्ये १) पहिला क्रमांक सौ. पल्लवी चाफळकर, २) दुसरा क्रमांक सौ. आर्या उंबरजकर, ३) तिसरा क्रमांक सौ. गौरी घिगे यांना उपस्थितांच्या हस्ते स्मृती चिन्ह,प्रमाणपत्र गुलाब पुष्प देवुन गौरवण्यात आले व दोन्ही स्पर्धा मध्ये सहभागी घेतलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थितांचे स्वागत सौ.स्वाती बाळा दानवले यांनी केले व आभार, बाळा दानवले यांनी मानले. या कार्यक्रमा बाबतीत अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व आभार मानले.  

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मा.बाळा दानवले
उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर व
सौ.स्वाती बाळा दानवले महिला प्राधिकरण विचार मंच निगडी यांनी केले होते.
बक्षिस वितरण समारंभ: महिला प्राधिकरण विचार मंच व महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा "ऑनलाईन स्पर्धा" आयोजित बक्षिस वितरण समारंभ: महिला प्राधिकरण विचार मंच व महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा "ऑनलाईन स्पर्धा" आयोजित Reviewed by सह्याद्री चौफेर on August 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.