सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (११ ऑगस्ट) : तालुक्यातील बामर्डा येथील गावाला जोडणारा पूल पूर्णपणे खचला आहे. दरवर्षी पूर येऊन तो पूर्ण जीर्ण झाला असून अखेर च्या घटका मोजत आहे. याबाबत प्रशासन लोकप्रतिनिधी अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे आरोप येथील विधी अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसूटकर यांनी राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे देखील तक्रारी यापूर्वी केल्या आहे. गेल्या अनेक वर्षपासून धनंजय आसुटकर या प्रकरणाला सातत्याने पाठपुरावा करून स्थानिक व तालुका आणि जिल्हा लेवल मागणी करत आहे. मात्र, त्यांची कोणी ही दखल घेत नाही किंबहुना बामर्डा गावाला जोडणाऱ्या पुलाची संबंधित लोकं दखल घ्याला तयार नाहीत, असा थेट त्यांनी आरोप केला आहे. परंतु काही का असेना जि प सदस्या अरुणाताई खंडाळकर यांनी या पुला करिता गिट्टी टाकली. त्याला एक महिना लोटत आहे. परंतु या पुलाचे बांधकाम व्हायच्या आधी टाकलेली गिट्टी पुराणे वाहून गेली असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा येथील पुलाचा प्रश्न एरणी वर आला असून, आता आणखीण मार्गी लागावा म्हणून त्यांनी सह्याद्री ई न्यूज शी आपले मत मांडले. पुढे बोलतांना म्हणाले की, पुलाच्या संदर्भात बऱ्याच तक्रारी प्रशासन,शासन दरबारी केल्या आहे. एवढंच नव्हे तर चक्क राज्य व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे देखील यापूर्वी तक्रार केल्यावर २ महिन्यांनंतर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं, पण बांधकाम झालं नसल्याने त्यांच्या यशा'वर पाणी फिरलं. टाकलेली सगळी गिट्टी वाहून गेली आहे. वारंवार सूचना देऊन ही जर स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसेल तर पुढचा पर्याय म्हणून ते येत्या काही दिवसात पुलाच्या बांधकामकरिता तालुका स्तरावर आमरण उपोषणाला आपण बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बामर्डा येथील खचलेल्या पुलाच्या प्रयत्नाला आले यश; पण मात्र...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 11, 2021
Rating:
