किशोर भाऊ तिवारी यांची विषबाधित, मृतक शेतकर्‍यांच्या घरी सांत्वन पर भेट


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (११ ऑगस्ट) : तालुक्यातील खेडी,वनोली या गावचे शेतकरी विनोद वसराम चव्हाण यांच आपल्या शेतामध्ये कापूस या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळत असल्याने प्रतिबंधित बंदी असलेले अति विषारी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.

या वर्षीच्या चालू खरीप हंगामामध्ये हा राज्यातील कीटकनाशक विषबाधेचा पहिलाच बळी पडला आहे. या घटनेने पुन्हा राज्यामध्ये खळबळ माजली, कारण दोन वर्षांपूर्वी या जिल्ह्यांमध्ये २२ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी पडले आहे. त्यामुळे संपूर्ण शासनासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याच घटनेची दखल घेऊन किशोर भाऊ तिवारी वसंतराव नाईक शेती मिशनचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा असलेले व मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांनी आज या विषबाधा झालेल्या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन पीडित त्यांच्या पश्चात असलेल्या बेबीताई चव्हाण मृत शेतकऱ्यांच्या सुविद्य पत्नी व त्यांचा मुलगा अनिकेत गोलू व मुलगी नंदनी या दुखी शेतकरी कुटुंबांच संवाद साधून सांत्वन केल, त्यांना मानसिक आधार देऊन शासन स्तरावर उपाय योजनेअंतर्गत सर्व मिळणारी मदत व तातडीने त्यांना मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचना केल्या.
अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना मास्क हॅन्ड ग्लोज व किटचा वापर करून दक्षता घेऊन फवारणी करावी व या संदर्भाने कृषी विभागाने कार्यतत्परता दाखवत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मार्गदर्शन करावे. अशा पद्धतीच्या सूचना उपस्थित असलेल्या सर्व तालुका स्तरावरील अधिकारी वर्गांना करण्यात आल्या.

यावेळी या भेटीदरम्यान महागाव पंचायत समितीच्या सभापती अनिता ताई चव्हाण, नरेंद्र जाधव माजी सरपंच सुभाष भाऊ जाधव वनोली, विलास भाऊ चव्हाण, नामदेव इसाळकर, तहसीलदार, विजय मोकाडे, तालुका कृषी अधिकारी, ब्रह्मानंद चव्हाण, संजय शेळके कृषी सहाय्यक, वैद्य पटवारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दौऱ्या अंतर्गत गटविकास अधिकारी व संबंधित कार्यक्षेत्र अंतर्गत असलेले ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस प्रशासन उपस्थित नसल्याबद्दल किशोर भाऊ तिवारी यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या व खंत व्यक्त केली. 


"पुसद विधानसभा मतदार संघातील लोकनियुक्त आमदारासह दोन विधान परिषद आमदार लाभले आहेत व एक खासदार यांनी या पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेणे अपेक्षित होते, कारण हे राज्यातील पहिला विषबाधेचा बळी आहे. अद्याप पर्यंत भेट घेतली नाही, याबद्दल काळी दौ सर्कल मधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी हा फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठी या नेत्यांना आठवतो का ? असा यक्ष प्रश्न परिसरातील शेतकर्‍यांना पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या बारोमास न संपणाऱ्या व्यथा, वेदनांना अंत नाही व स्थानिक प्रस्थापित नेत्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेला असताना अशा पद्धतीने स्थानिक नेत्यांनी शेतकऱ्याला पाठ फिरवावी हे या पुसद विधानसभा मतदार संघात दुर्दैवी बाब असल्याचे मत शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी या वेळी आपली खंत व्यक्त केली."




किशोर भाऊ तिवारी यांची विषबाधित, मृतक शेतकर्‍यांच्या घरी सांत्वन पर भेट किशोर भाऊ तिवारी यांची विषबाधित, मृतक शेतकर्‍यांच्या घरी सांत्वन पर भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on August 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.