मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन जागे विरोधात खापरी येथील नागरिकांनी आक्षेपार्हत दिले निवेदन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०३ ऑगस्ट) : मारेगाव नगरपंचायतने खापरी येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची निवड केली. महसूलातील भुमापन क्रमांक ५१ मधील एकुण क्षेत्र ४.१९ हे. आर. अधिक पो.ख.०.१९ हे. आर.पैकी १.०० हे.आर. शासनाचे मालकीची शेत जमीनची नगरपंचायतने मागणी केली.

मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन जागे विरूद्ध खापरी येथील नागरिकांनी आक्षेपार्हत घेवून तहसीलदार यांना निवेदन दिले. मागणी केलेली जागा ही खापरी गावाला लागून असल्याने मारेगाव नगरपंचायतकडून घनकचरा टाकला गेला तर खापरी गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शिवाय विविध प्रकारच्या आजार निर्माण होऊन गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच भुमापन क्रमांक ५१ क्षेत्र ४.१९ आर ही जागा आधीच खापरी गावाला पुनर्वसन केलेली जागा असल्याने या जागेवर शहरातील आणलेली घाण या मागणी केलेल्या जागेवर टाकल्यास गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरू शक्यते, त्यामुळे ही जागा देवू नये असा इशारा खापरी येथील नागरिकांनी हरकत घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिले. जर ती जागा दिली तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा खापरी येथील नागरिकांनी दिला आहे.
 
निवेदन देतेवेळी सुरेश पाचभाई, संतोष आवारी, प्रभाकर कुचनकर, संदिप भिमराव उरवते, सुनील आवारी यांच्या सह गांवातील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन जागे विरोधात खापरी येथील नागरिकांनी आक्षेपार्हत दिले निवेदन मारेगाव नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन जागे विरोधात खापरी येथील नागरिकांनी आक्षेपार्हत दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.