लालगुडा ग्रामपंचायतेने सुरु केला विकास कामांचा धडाका

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१८ ऑगस्ट) : तालुक्यातील लालगुडा येथे ग्रामपंचायतेच्या विकासकामांचा धडाका सुरु झाला असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सुधार योजनेंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. विकासकामांना प्राधान्य देण्याचा ग्रामपंचायतेचा असलेला मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचतेची गावाच्या विकासाकडे वाटचाल सुरु झाली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या सुधार योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून करण्यात येणार असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची काल मुहूर्तमेढ रोवल्या गेली. जी.प. सदस्य बंडू चांदेकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही विकासकामे केली जात असून या विकास कामांचे भूमी पूजनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले. या भूमी पूजन कार्यक्रमाला प.स. उपसभापती चंद्रज्योती सुरेश शेंडे, गटविकास अधिकारी गायनार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला सरपंच धनपाल चालखुरे, उपसरपंच निलेश कोरवते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बचत प्रतिनिधी व ग्रामस्थही उपस्थित होते.

लालगुडा गावाचा सर्वोतपरी विकास हेच मुख्य उद्दिष्ट जोपासून गावाच्या विकास कामांवर भर देण्याचा ग्रामपंचायतेचा प्रयत्न राहणार असल्याचे सरपंच धनपाल चालखुरे यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सुधार योजनेंतर्गत गावातील तिन सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. वस्तीतील दोन सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाकरिता पांच पांच लाख तर एका सिमेंट रस्त्याच्या बांधकामाकरिता चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच गटारे व नाल्यांच्या बांधकामाकरिता निधी मिळणार असल्याचीही सरपंच धनपाल चालखुरे यांनी सांगितले. एकूणच लालगुडा ग्रामपंचायतेंतर्गत गावात विकासकामांचा सपाटाच सुरु होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे.
लालगुडा ग्रामपंचायतेने सुरु केला विकास कामांचा धडाका लालगुडा ग्रामपंचायतेने सुरु केला विकास कामांचा धडाका Reviewed by सह्याद्री चौफेर on August 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.