सह्याद्री न्यूज : नंदकुमार मस्के
महागाव, (१८ ऑगस्ट) : तालुक्यातील सेवानगर कासारबेळ तांडा येथे हरित क्रांतीचे प्रणेते पंचायत राजचे जनक रोजगार हमी योजनेचे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कापूस एकाधिकारयोजना धवल क्रांतीचे प्रणेते कृषी विद्यापीठ विद्यापीठ प्रणेते पाझर तलाव व वसंत बंधारा प्रणेते योजना महर्षी बहुजन कैवारी महाराष्ट्र घडवणारा महानायक गरीबाचा नेता राज्य सुजलाम सुफलाम करणारे सर्वाधिक काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविणारे महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या 42 च्या स्मूतिदिनानिमित्य विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी गावकरी यांनी स्व नाईक साहेब यांना आदरांजली वाहिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ जाधव यांनी स्व नाईक साहेबाच्या विचारावर प्रकाश टाकला कठीण काळात राज्यातील जनतेला स्व नाईक साहेबांनी कशाप्रकारे धीर दिला. राज्यात 1972 सली पडलेल्या दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड देऊन राज्याला व जनतेला स्थैर्य दिले. यांचे शनिवारवाड्यातील फाशीचे वक्तव्य हे जनतेप्रती असलेले कळकळ यांचीच प्रचिती होती. खरोखर महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत त्याने स्वयंपूर्ण करून दाखविला. हायब्रिड बियाणे उपलब्ध करून शेतकऱ्यांना आधार दिला. कापूस एकाधिकार योजना राबविली. महाराष्ट्रत दुधाची गरज पूर्ण करण्यासाठी धवल क्रांती घडवून आणली. शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी कृषी विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठातील अभ्यासामुळे व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या कृषी विषयक ध्येयधोरण आर त्यांच्या काळात अमुलाग्र बदल घडून आला. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या अत्यंत महत्वाच्या काळात महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळू शकले. परिणामी विकासाला योग्य आणि गतिमान दिशा मिळाली. त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष एमडी भाऊ राठोड, नथू चव्हाण, नरसिंग राठोड, दिलीप राठोड सर, सुनील राठोड, पवन जाधव, आशिष जाधव, शुभम राठोड, अतुल राठोड, शिवकिरण राठोड, प्रफुल पवार, अनिल राठोड, विकास राठोड, सतीश चव्हाण, अमित राठोड, सुजित राठोड, सरपंच शरद राठोड उप सरपंच विष्णु जाधव, व महानायक वसंतराव नाईक प्रतिष्ठान चे सर्व सदस्य उपस्थित होते.