राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी प्रविण पाटील ठाकरे तर विजय सुर्यवंशी शहर प्रमुख पदी निवड
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१८ ऑगस्ट) : लोकनेते मनोहरभाऊ नाईक यांच्या आदेशाने आमदार इंद्रनिलभाऊ नाईक, माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर, प्रा.शिवाजीराव राठोड, दौलत नाईक, प्रा. सितारामजी ठाकरे, पंजाबराव खडकेकर, साहेबराव पाटील, विजय महाजन मोहनराव करे, अनिल नरवाडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या तालुका अध्यक्ष पदी प्रविण पाटील ठाकरे तर महागाव शहर प्रमुख पदी विजय सुरवंशी यांची निवड झाली. ही निवड लोकनेते मनोहर नाईक यांच्या आदेशाने करण्यात आली.
या निवडी श्रेय ईद्रनिलभाऊ नाईक माजी आमदार संदिप भाऊ बाजोरिया जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्या आशीर्वादाने प्रा.शिवाजीराव राठोड दौलत नाईक, साहेबराव पाटील हिवरेकर, पंजाबराव देशमुख खडकेकर, संदिप पाटील ठाकरे, विजय महाजन मोहनराव करे, अनिल नरवाडे यांच्या आशिर्वादाने माझी निवड झाली. असे भावनिक उदगार प्रविण पाटील यांनी काढले.
विशेष उल्लेखनीय की, प्रा. सिताराम पाटील माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांचे ते चिरंजीव आहेत. पक्ष बळकटी करणासाठी तरूण चेहरा दिल्यामुळे तरुणाई मध्ये नव चैतन्य मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी प्रविण पाटील ठाकरे तर विजय सुर्यवंशी शहर प्रमुख पदी निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 18, 2021
Rating:
