सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१८ ऑगस्ट) :- राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या माध्यमातून आज १८ ऑगस्ट रोजी महागाव शहरामध्ये महानायक वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथीनिमित्त शैलेश कोपरकर यांचा हस्ते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या तेलचित्रास दीप प्रज्वलित करून हार अर्पण करुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी महागाव नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर, राष्ट्रीय बंजारा परिषद संघटना चे युवा जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दीपक आडे, जिल्हाध्यक्ष आर बीपी एडवोकेट रवींद्र बाबुसिंग जाधव, संतोष पवार, युवा सरपंच अमोल चिकणे ,सुनील राठोड तालुका अध्यक्ष आर बीपी, प्रवीण जाधव तालुका सचिव, दिनेश जाधव संघटक, विजय चव्हाण, सतीश जाधव, अंकुश आडे, सतीश पाटील, राम राठोड करंजखेड, प्रकाश भांगे, अंकुश कावळे, मंचकराव खंदारे, सुनील चव्हाण, विक्रम राठोड, अजेश जाधव, विनोद चव्हाण, अविनाश व खंदारे सर्व समाज बांधव व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.