मध्यरात्री घरातील जुगारावर पोलिसांचा छापा, ६७ हजारच्या मुद्देमालासहित दहा जुआरी ताब्यात

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव, (१८ ऑगस्ट) : मारेगाव शहरातील प्रभाग क्र.४ मधील एका घरात पत्याचा खेळ चालू असलेल्या जुगार टोळीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. रोख रकमेसह एक मोटार सायकल, पाच मोबाईल असा एकूण ६७ हजार रुपयाचा ऐवज जप्त करून दहा संशयितांना मंगळवारीच्या मध्यरात्री ताब्यात घेतले. (Maregaon News, Crime News)
सूत्राच्या माहितीनुसार, शहरातील प्रभाग क्र. ४ मधील एका नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. येथेच काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना कळली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी या माहितीच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, बिट जमादार आनंद आचलेवार, बंटी मेश्राम, अनिल गिनगुले, यांनी  छापा टाकला असता, घरातील खोलीत बसून ५२ पत्ते घेऊन जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

यावेळी पोलिसांनी त्यांच्या कडून रोख रक्कम ६७ हजार  रूपये, जुगाराचे साहित्य, एक मोटार सायकल असा ऐवज जप्त केला यात मारेगाव येथील तर मांगरूळ येथील दोघे असे दहा संशयितावर ताब्यात घेण्यात आले. कलम ४,५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्यवे कारवाई करण्यात आली. यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मारेगाव पोलिसांनी सनासुदीच्या पर्वावर  ठाण्यातंर्गत येणाऱ्या शहर ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था व शांतता राहावी याकरिता कंबर कसल्याचे दिसून येते.
मध्यरात्री घरातील जुगारावर पोलिसांचा छापा, ६७ हजारच्या मुद्देमालासहित दहा जुआरी ताब्यात मध्यरात्री घरातील जुगारावर पोलिसांचा छापा, ६७ हजारच्या मुद्देमालासहित दहा जुआरी ताब्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on August 18, 2021 Rating: 5
Powered by Blogger.