वसंतनगर येथील युवा शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मारेगाव तालुक्यातील घटना

                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (० ४ ऑगस्ट) : तालुक्यातील वसंतनगर येथील २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने (ता.२७) जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास राहत्या घरी औषध प्राशन केले होते. कुटुंबीयांनी उमरी येथील रूग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचार करून वैद्यकीय सल्ल्यानुसार नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील उपचार सुरु असतांना मात्र, उपचारादरम्यान नागपूरच्या रुग्णालयात दि.३ ऑगस्ट रोज मंगळवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान महेश दयाल राठोड यांचा मृत्यू झाला. आत्महत्याचे कारण अस्पस्ट असून, महेश यांच्या पाठीमागे  आई,वडील पत्नी व असा मोठा आप्त परिवार आहे.
वसंतनगर येथील युवा शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मारेगाव तालुक्यातील घटना वसंतनगर येथील युवा शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, मारेगाव तालुक्यातील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on August 04, 2021 Rating: 5
Powered by Blogger.