सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ, (०४ ऑगस्ट) : राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेबांचा त्रिसूत्री विचारांचा वारसा जपत “सत्यशोधन – समाजप्रबोधन- राष्ट्रनिर्माण“ या मुलमंत्रासह कार्यरत होण्यासाठी आपल्या विदर्भ दौर्याची सुरुवात करताना विदर्भ अध्यक्ष चेतनभाऊ आगलावे यांच्या नेत्रुत्वात दिनांक ०३ ऑगस्ट रोजी स्थानिक वैद्य नगर यवतमाळ येथील कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विशालभाऊ राठोड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनसह राष्ट्रीय समाज पक्षात पक्षप्रवेश केला.
या वेळी प्रामुख्याने विशालभाऊ राठोड यांची यवतमाळ तालुका अध्यक्ष पदावर अमित खंद्रे आणि आकाश कटूकार यांची विभाग प्रमुख तर समाधान रंगारी यांची शहर अध्यक्ष सोशल मीडिया सेल या पदावर नियुक्ती करण्यात आली.
या सह अनेकांनी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय समाज पक्षात पक्षप्रवेश केला.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष अमोल डफाल, प्रदीप कोरी शहर अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष प्रशांत नखाते, शहर अध्यक्ष युवा आघाडी अंकुश मस्के, शहर उपाध्यक्ष युवा आघाडी समीर शाह, अब्दुल तौकीर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सपकाळ, नितीन मोखाडकर, सुरेश नागभीडकर, महादेव लांबट, अक्षय सोयाम, शुभम वाघाडे, गणेश सोळंकी, महेश मसराम, तुशार चोंडके
या सह मोठ्या संख्येने स्थानिक बांधव उपस्थित होत.
यवतमाळातील प्रत्येक विभागात,प्रत्येक वार्डात तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, अनेक विभागात तसेच विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी मेळावे घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष मजबुती ने उभा करण्याचा विश्वास अध्यक्षीय भाषणात चेतनभाऊ आगलावे यांनी व्यक्त केला.
सर्व नियुक्त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आपला,
चेतन आगलावे
विदर्भ अध्यक्ष (पूर्व विभाग)
राष्ट्रीय समाज पक्ष.
७२६४०१५८२८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्षांचा राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर पक्षप्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 04, 2021
Rating:
