सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (०४ ऑगस्ट) : एन सहा सिडको मथुरानगर कुलस्वामीनी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुस गेल्या अनेक वर्षापासुन ड्रेनेजलाईन लाईनचे काम प्रलंबीत होते. वारंवार ड्रेनेजलाईन चोकअप होणे चेंबरमधुन घाण पाणी वरती येऊन रस्त्यावर वाहणे, त्यामधुन दुर्गधी येणे तेच घाण पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये निचरा होऊन तेच पाणी नळाद्वारे येऊन नागरीकांना ते घाण पाणी प्यावे लागत असे. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे यांनी महानगरपालीकेकडे वारंवार पाठपुरावा करून ड्रेनेजलाईनचे काम करण्यास भाग पाडले.
परंतु या कामात संबंधीत कत्राटदार, शाखा अभियंता व महानगरपालीकेतील कर्मचारी यांनी निष्कृष्ट दर्जाचे कामास सुरूवात केली आहे. संबंधीत कामाचे कार्यरंभ आदेश, अंदाजपत्रक, व मार्गदर्शक सुचना कुठेही प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. संबंधीत काम हे कत्राटदारास देण्यास कुठल्याही प्रकारची निविदा प्रसिद्धीस देण्यात आलेली नाही. यापूर्वी या प्रभागात संबंधीत कत्राटदाराने निष्कृष्ट दर्जाचे काम केले आहे, यांच्या अनेक तक्रारी अनेक नागरिकांनी आपल्या कार्यालयास सादर केलेल्या आहेत.
करिता संबंधित काम तात्काळ बंद करण्यात यावे, करण्तात यावे, खुली करण्यात आलेली ड्रेनेजलाईन व त्यापासुन नागरीकांना होणारी असुविधा याचे तात्काळ नियोजन करण्यात यावे संबंधित कत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे व वरील कामे नवीन कत्राटदाराला देऊन ड्रेनेजलाईनचे काम चांगल्या व दर्जेदार पद्धतीने करावे नसता स्थानिक नागरीकांनाच्या वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे महानगरपालीकेला निवेदनाद्वारे कळवले आहे.
या निवेदनावर मनीष नरवडे, आकाश गायकवाड, म्हस्के, सागर शेजुळ, विक्की शेजुळ, अनिल वैद्य, सुनिल वैद्य, ॠशीकेश शेजुळ, सुनिल तिडके, सोनु चौथमल, अभिजीत निकाळजे, दिपक म्हस्के, शैला दाभाडे, आकाश शेजुळ, ओम कुकलवार, शंकुतला चौथमल, राम बिडवे, शितल वैद्य, आशा आरकिले, साहेबराव प्रधान, रमेश ठोबरे, भिमाबाई नेमाने, मीणा राणा ज्ञानेश्वर ढापसे इत्यादीच्या सह्या आहेत.
मथुरानगरातील नागरीकांनी ड्रेनेजलाईनचे बोगस होत असलेले काम पाडले बंद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 04, 2021
Rating:
