सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०९ ऑगस्ट) : राजूर कॉलरी येथील मजूर कुटुंबातील मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील केळवण या गावातून त्याला अटक करण्यात आली आहे.राजूर कॉलरी येथे कामानिमित्त आलेल्या या १९ वर्षीय तरुणाने येथीलच अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना १९ जूनला उघडकीस आली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. आरोपीचे लोकेशन ट्रेस होताच गोंदिया जिल्ह्यात पोलिस पथक पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजार केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मयूर बलदेव शहारे (१९) रा. केळवण ता. अर्जुनी जि. गोंदिया असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजूर कॉलरी येथील एका मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी १७ जूनला दुपारी २ वाजता घरून बेपत्ता झाली. आईला मोठेबाबाच्या घरी जाते असे सांगून घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. तिचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर तिच्या वडिलांनी १९ जूनला सायंकाळी ५.४७ वाजता मुलगी घरून बेपत्ता झाल्याची तक्रार स्टेशनला नोंदविली. तसेच मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा संशयही वडिलाने तक्रारीतून व्यक्त केला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. परिसरातील नागरिक व नातेवाईकांकडे चौकशी केली. प्रत्येक अँगलने तपास करण्यात आला. दरम्यान राजूर कॉलरी येथे कामानिमित्त आलेला तरुण गावात दिसून येत नसल्याचे समजताच पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तब्बल दीड महिन्यानंतर त्याचे लोकेशन ट्रेस झाले. तो गोंदिया जिल्ह्यातील केळवण या गावचा रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होताच त्याठिकाणी पोलिस पथक पाठवून त्याला अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलगी व आरोपी या दोघांनाही वणी पोलिस स्टेशनला आणून मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यावेळी अज्ञात आरोपीवर भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर गुन्ह्यात वाढ करून त्याच्यावर भादंविच्या ३६६(अ), ३७६(२), ४,६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मयूर बलदेव शहारे याला काल न्यायालयात हजार करण्यात आले. न्याधीशांनी त्याला ११ ऑगष्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी टिपूर्णे, पोकॉ अमोल नुनेलवार करित आहे.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 09, 2021
Rating:
