किनवट येथे जागतिक आदिवासी दिवस उत्सहात साजरा

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (०९ ऑगस्ट) : आज शहरात 'जागतिक आदिवासी दिन' या पर्वावर सकाळपासून आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते संदेश भाऊ केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       
यावेळी किनवट शहरातील अशोक स्तंभा येथील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास संदेशभाऊ केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत हार अर्पण करण्यात आले. नंतर 'लोकार्पण' जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी बिरसा मुंडा व विर बाबुराव सेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून महात्मा फुले चौक, अन्ना भाऊ साठे, जिजामाता चौक, बिरसा मुंडा चौक, आंबेडकर चौक, ठाकरे चौक गोकुंदा या मार्गे आदीवासी युवकांनी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
        
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे रुग्णांना फळवाटप करुन दत्तनगर, हनुमान मंदिर, समता नगर मार्गे किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले. दिवस भर चाललेल्या कार्यक्रमाची सांगता आमदार भीमराव केराम यांचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी करण्यात आली असून संदेश केराम यांनी सर्वांचे आभार मानले. 

या कार्यक्रमास स्वीय सहायक प्रकाश कुडमेथे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष जितेंद्र कुलसंगे, सरपंच अनिल कनाके, संजय सिडाम, संतोष मरसकोल्हे, डॉ. गुहाडे, आशीष उर्वते, फजल चव्हाण, अजय सिदम, आशीष कुमरे, दत्ता भिसे, अरविंद पेंदोर, गौरव आत्राम, रोहित कुलसंगे, संतोष गीते, अमोल जधव, विक्की वाघमारे, दादाराव टेकाम, प्रमोद कोसरे, नितिन भरके, अक्षय मरसकोल्हे आदींची उपस्थिती होती.
किनवट येथे जागतिक आदिवासी दिवस उत्सहात साजरा किनवट येथे जागतिक आदिवासी दिवस उत्सहात साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.