सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१० ऑगस्ट) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व बार्टी पुणे च्या वतीने बिलोली तालुक्यातील खतगाव व माचनुर येथे समता केंद्र स्थापन करण्याची बांधनी समतादुत शारदा माळे खतगाव तर माचनुर येथे शेख ईर्षाद मौनाला यांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती समतादुत शारदा माळे यांनी दिली.
गावात शांतता नांदावी व कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नये असा उद्देश आहे. आज खतगाव येथे सरपंच व ईतर लोकांना ह्या केंद्राची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रकल्प आधीकारी श्रीमती सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता केंद्र स्थापन करण्यात येत असल्याचे समतादुत यांनी सांगितले.
बार्टीच्या वतीने गावा- गावात जाऊन समता केंद्राची बांधनी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 10, 2021
Rating:
