शंकरनगर येथील महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची मोफत आयएएस प्रशिक्षणासाठी निवड.


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (०६ ऑगस्ट) : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील शिव विद्या प्रबोधिनी पब्लिक ट्रस्टच्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमी तर्फे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत. 
 
शिव विद्या प्रबोधिनी पब्लिक ट्रस्ट ही दोन दशकापासून पदवी पूर्ण केलेल्या अथवा पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत यूपीएससी सिविल सर्विसचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करते. या ट्रस्ट तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील एकूण ६० हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये शंकरनगर येथील वरिष्ठ महाविद्यालयातील गणेश जांभळे, बालाजी धानेकर आणि रोहित पांचाळ हे तीन विद्यार्थी मोफत यूपीएससी प्रशिक्षणासाठी पात्र झाले आहेत. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी पिंपळे, महाविद्यालयातील स्पर्धापरीक्षा समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. वसंत पवळे, प्रा. डॉ. सुनील कदम आणि प्रा. गोविंद पांचाळ यांनी मार्गदर्शन केले होते. प्राचार्य डॉ. बालाजी पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोविंद पांचाळ यांनी केले तर प्रा. डॉ.सुनील कदम यांनी आभार मानले.
 
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ रत्नाळीकर, प्रा. डॉ. शिवाजी पाटोदे, प्रा. डॉ. दिलिप पांपटवार, प्रा. डॉ. दयानंद माने, प्रा. शिवाजी कांबळे, प्रा. डॉ. अनिल माने, नारायण जांभळे, गणपत धानेकर,गोविंद भंडरवार, शेख अकबर, भैय्यासाहेब एडके,तिरूपती पुयड,पांडुरंग वानखेडे आदी उपस्थित होते.
शंकरनगर येथील महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची मोफत आयएएस प्रशिक्षणासाठी निवड. शंकरनगर येथील महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची मोफत आयएएस प्रशिक्षणासाठी निवड. Reviewed by सह्याद्री चौफेर on August 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.