टॉप बातम्या

'त्या' मृत्युदेहाच्या भावाने दिली मारेगाव पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल: मात्र,संशयित आरोपी फरार


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०६ ऑगस्ट) : हत्या की घातपात?
असा अनेक तर्क वितर्क लावले जात असतांना प्रमोदची  हत्या करण्यात आली अशी तक्रार मृताकांच्या भावाने मारेगाव पोलिसात दाखल केली आहे. आरोपी फरार असून, पोलीस संशयित आरोपीच्या मार्गावर आहे. 

तालुक्यातील अर्जुनी येथील 25 वर्षीय युवकाचा दि.5 ऑगस्ट रोजी घोडदरा (शिवनाळा) शेतात शंका येणाऱ्या अवस्थेत मृत्यूदेह आढळून आला होता. दरम्यान पॅन्ट कमरेच्या खाली सरकलेला, चिखलात तुडवल्या सारखे, व तोंडाला फेस अशा अवतराने तालुक्यात एकचखळ बळ उडाली होती. शिवाय मृतक हा अर्जुनीचा आणि मृत्यूदेह घोडदरा (शिवनाळा) शेत शिवारात संशयास्पद आढळून आल्याने आणखीन चर्चेला मोठे उधाण आले होते.

दि.5 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान, गजानन धवने यांच्या शेतातील कपाशीत प्रमोद चा मृत्यूदेह आढळून येताच मृतकाचा भाऊ विनोद घटनास्थळी दाखल झाला व त्याने मृत्यूदेह बघताच हा अपला भाऊ असल्याचे लक्षात घेत त्याने परिसरात शहानिशा केल्यावर मारेगाव पोलीस स्टेशनला संशयित आरोप देविदास नाना रामपुरे (28), सत्यपाल वासुदेव आत्राम (29) रा. खेकडवाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
फिर्यादी विनोद याने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केल्याचे लक्षात येताच संशयित आरोपीनी पोबारा केल्याची माहिती समोर आली. संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार जगदीश मंडलवार व पोउनि अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.
 
Previous Post Next Post