उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या वाहणाला भीषण अपघात


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (३१ ऑगस्ट) : वणी येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा राळेगाव ते वडकी मार्गावरील सावंगी टर्निंग जवळ भीषण अपघात झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आपले कार्यालयीन काम आटपुन यवतमाळ वरून राळेगाव मार्गे वणीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वाहन चालक परेश मानकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे वाहनांनी प्रवास करीत होते. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती राळेगाव येथील ठाणेदार मुडे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि अपघातात जखमी झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना यवतमाळ येथील संजीवनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. बातमी लिहेपर्यंत हा अपघात कशामुळे झाला. अजून पर्यंत माहिती मिळाली नसुन, समोरील तपास राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या वाहणाला भीषण अपघात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या वाहणाला भीषण अपघात Reviewed by सह्याद्री चौफेर on August 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.