Top News

पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाची वाळू माफिया विरुध्द धडक कारवाई

सह्याद्री न्यूज | रुतुजा सोनवणे
बीड, (०७ ऑगस्ट) : बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांच्या पथकाने वाळू माफिया विरुध्द कारवाई करुन बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.

आर राजा यांच्या पथकाचे प्रमुख एपी आर हजारे यांच्या टीम ने आज पहाटे गेवराई तालुक्यातील राक्षभुवन येथील परिसरातील वाळू माफिया विरुध्द धडक कारवाई दरम्यान, त्यांना नदी पात्रात जेसीबी हायवामध्ये वाळू उपसा सुरु असतांना विशेष पथकाने छापा टाकला. त्या मध्ये दोन जेसीबी, हायवा क्रमांक एम.एच.२३ ए. व्ही. १८५५, हायवा क्रमांक एम.एच.४६ ए.आर. ४१४८ व काही वाळू उपसा असा, १ कोटी २ लाख २० हजार रुपयेचा माल जप्त करुन ८ जणांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जेसीबी चालक संदीप सुरेश पवळ रा.ढाकलगाव तालुका अंबड, हायवा चालक सलमान मिर्झा बेग (२४) रा. इस्लामपुरा बीड, हायवा चालक महादेव दगडू निर्मळ  (३५) रा.शिदोड तालुका बीड सोबत आणखीन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी एक जेसीबी चालक फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले आले आहे.
Previous Post Next Post