टॉप बातम्या

जुनोनी येथे बीज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
झरी, (१७ ऑगस्ट) : ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत जुनोनी येथे बिज रोपण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाची कृषी कन्या कु. अभिलाषा प्रवीण झाडे यांनी बीज रोपणाच्या पद्धती समजावून सांगितल्या. योग्यरीत्या बीज रोपण केल्यास उगवण शक्ती कशी वाढते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बीज रोपण प्रक्रियेमुळे पिकांवर येणारी रोगराई कमी होते, बुरशीचा नायनाट होतो, पिकाची संपूर्ण वाढ होई पर्यंत पिकांना संरक्षण मिळते. दरवर्षी पेरणी करण्यापूर्वी प्रत्येक बियाण्यांची बीज प्रक्रिया करणे अत्यंत जरुरी असते. बीज प्रक्रियेचे संपूर्ण फायदे व बीज प्रक्रिया कशी करावी, याबद्दल संपूर्ण माहिती कु. अभिलाष झाडे यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच आधुनिक शेत प्रणाली बद्दल योग्य मार्गदर्शनही केले. या उक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडू, विषय तज्ञ डॉ. प्रतिक बोबडे, के.टी. ठाकरे, ए.ए. डोंगरवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास शरद पळवेकर, राजू कवाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous Post Next Post