सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०३ ऑगस्ट) : न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी भुरकी येथील चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर येथील मंडल अधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशावरून शेताच्या धुऱ्यावर गाडून दिलेले खुटे आरोपींनी उफडून फेकत शेतमालकाला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिल्याची तक्रार शेतमालकाने पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. तालुक्यातील भुरकी या गावात एकमेकांच्या शेजारी रहात असलेल्या व्यक्तींची शेतीही एकमेकांना लागूनच आहे. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून आपसी वाद सुरु असून त्यांचा शेतातून जाण्यायेण्या वरूनही वाद उफाळून यायचा. आरोपी हे फिर्यादीच्या शेतातून बैलं नेत असल्याने त्यांच्यात नेहमी वादाच्या ठिणग्या उडायच्या. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या वादाचा निपटारा करतांना राजूर येथील मंडळ अधिकाऱ्यांना शेताच्या धुऱ्यावर खुटे गाडण्याचे आदेश दिले. मंडल अधिकाऱ्यांनी शेताच्या सीमा निर्धारित करत धुऱ्यावर खुटे गाडून दिले. आरोपींनी फिर्यादीच्या शेतातून जाऊ नये, याकरिता हे खुटे गडण्यात आले.
पण आरोपींनी हे खुटेच उफडून फेकत बैलं शेतातून नेल्याची तक्रार दिलीप कृष्णा बदकी (५०) रा. भूरकी या शेतकऱ्याने वणी पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. बैलं शेतातून नेण्यास रोखले असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही दिलीप बदकी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शेताच्या धुऱ्यावरील खुटे उफडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शालिक नानाजी भोयर (५५), अनिल नानाजी भोयर (४५), रंजना अनिल भोयर (४०), शुभम अनिल भोयर (२३) यांच्यावर भादंवि च्या कलम २९४, ४३४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार प्रदीप गोर्लेवार करीत आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार आरोपींवर गुन्हे दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
