वणी मुकुटबन मार्गावरील भिषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जख्मी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०३ ऑगस्ट) : वणी मुकुटबन मार्गावर झालेल्या भिषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना काल १ ऑगष्ट ला रात्रीच्या सुमारास घडली. वणी वरून मुकुटबनकडे जाणाऱ्या बुलेरो वाहनाला अज्ञात वाहनाने धडक देऊन ते पसार झाले. धडक एवढी जोरदार होती की बुलेरो वाहनाचा पार चुराडा झाला होता. अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी मोठी भीड जमा झाली. त्यांच्यातीलच काहींनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची स्थिती पाहता त्यांना चंद्रपूर येथे रेफर केले. तेथे एकाचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु आहे. 

वणी येथील कामे आटपून मुकुटबनकडे जाणाऱ्या बुलेरो क्रं. MH ३४ BF ८७४१ ला घोन्सा वळण रस्त्यापासून अगदी जवळच भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने बुलेरोला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहन चालक व सोबत असलेला युवक गंभीर जख्मी झाला. अपघातस्थळी जमा झालेल्या लोकांपैकी काहींनी त्यांना गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले.

चंद्रपूर येथे वाहन चालक संकेत गंगाधर सोनतितरे (३०) रा. नेरड याचा मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या प्रफुल देविदास मोहितकर (२३) रा. पुरड याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त बुलेरो ही मुकुटबन येथील एका कंपनीत कार्यान्वित असल्याचे कळते. हे दोघेही जण मुकुटबन येथीलच कंपनीत कार्यरत असल्याचेही सांगण्यात येते. वणी मुकुटबन या मार्गाने जड वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. वाहनांची जास्तीत जास्त चक्कर लागावी म्हणून वाहन चालक भरधाव वाहने चालवितात. त्यामुळे या मार्गावर अपघात वाढीस लागले आहे.

वणी मुकुटबन मार्ग हा नव्याने बांधण्यात आला असल्याने या रस्त्यावरून सुसाट वाहने चालविली जात आहे. सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर कार्यवाही होणे आता गरजेचे झाले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
वणी मुकुटबन मार्गावरील भिषण अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जख्मी वणी मुकुटबन मार्गावरील भिषण  अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जख्मी  Reviewed by सह्याद्री चौफेर on August 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.