कुंभकर्ण शासनाला जाग करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विभागीय कार्यालयावर एल्गार आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ जाधव
सह्याद्री न्यूज : नंदकुमार मस्के
महागांव, (०३ ऑगस्ट) : संतप्त पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने हंबरडा आक्रोश आंदोलन घेऊन मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात धडकले विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर महाराष्ट्रामध्ये पशुधन पर्यवेक्षक व खाजगी डॉक्टर यांनी पशुधनाचे उपचार न करण्याचे काम बंद आंदोलन हत्यार उपसले आहे त्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आल्याने पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झालेली आहे कारण दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व राज्यातील पशुधनाचे लसीकरणाचे काम या पशुधन संवर्धन विभागाच्या माध्यमातून होत असते पण दुर्दैवाने यावर्षी १५ जून पासून हे पशुधन पर्यवेक्षक पदविका प्रमाणपत्र धारकांची आहर्ता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करणे तसेच शासन अधिसूचना दिनांक २७ ऑगस्ट २००९ रद्द करून सुधारित अधिसूचना निर्गमित करणे अशा एक नव्हे अनेक वर्षापासून त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्यांना घेऊन त्यांनी टप्प्याटप्प्याने हे आंदोलन समोर घेऊन जात आहे. आज या आंदोलनाला दीड महिना उलटून गेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचे काम रखडले असून यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीस जे आजार उद्भवतात त्यामध्ये फऱ्या, घटसर्प, पीपीआर, आंत्रविषार असे आजार गुरा जनावरांना उद्भवतात यामुळे जनावर दगावतात आज उपचाराअभावी अनेक जनावरांचा तडफडून मृत्यू होत आहे. यामध्ये मुख्यतः बकऱ्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या आजारांचा संसर्ग प्रादुर्भाव वाढत असतो त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धास्ती निर्माण झाली आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन तक्रार देऊन सुध्दा शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्या गेला पण दुर्दैवाने राज्य शासनाने या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेल्याने, याचाच शल्य शेतकऱ्यांनी मनाशी धरून पशुधनाच्या चिंतेत आज पुसद येथील उपविभागीय अधिकारी उपजिल्हा अधिकारी सावन कुमार यांच्याकडे हजारोच्या संख्येने शेतकरी धडकून गुरा जनावर व बैलांन, म्हशीं, बकऱ्यांना घेऊन या कार्यालयावर धडकून आपली व्यथा वेदनाची कैफियत उपजिल्हाधिकारी सावन कुमार यांच्याकडे मांडली, राज्य शासनाने या पशुधन पर्यवेक्षकांच्या चालू असलेल्या आंदोलनाचा तोडगा काढून त्यांना दिलासा देऊन वेठीस धरल्या गेलेल्या शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय द्याव यासाठी गुरा जनावरांसह यामध्ये बैल म्हैस बकऱ्या सोबत घेऊन निवेदन करून हंबरडा आक्रोश आंदोलनाची सांगता केली दिनांक १, ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारला गेला आहे यामुळे पशुधनाचे लसीकरण करण्याचं रखडले गेले आहे.
आज जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधन आजारी होऊन तडफडून मरत आहे त्यांना योग्य उपचार खाजगी पदवीधारक पशु वैद्यकीय व पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडून मिळत नसल्याने पशुधन पालकांची व शेतकऱ्यांची मोठी कोंडी झालेली आहे तसेच शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता वाढली आहे. आंदोलन बेमुदत संप व प्रदीर्घ कालावधी साठी चिघळला तर याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांच्या पशुधनावर होणार आहे या पशुधन पर्यवेक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचा कोंडमारा व पशुधन अडचणीत आलेले आहे म्हणून राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून व या विभागातील विभागाशी असलेली संवेदनशीलता पाहता ग्रामीण विभागाचे शेतकऱ्यांची नाळ असलेल्या पशुधन पर्यवेक्षकांच्या मागणीच्या संदर्भात तातडीने मार्ग काढून त्यांना दिलासा देऊन वेठीस धरल्या गेलेल्या शेतकऱ्यांना निरपेक्ष न्याय द्यावा. अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री महोदय व पशुसंवर्धन मंत्र्यांकडे केली आहे अन्यथा या समोरच्या कालखंडामध्ये यापेक्षा हि उग्र आंदोलन दखल न घेतली गेल्यास केल्या जाईल असा गर्भित इशारा शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या साक्षीने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाला दिलेले आहे. या वेळी हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार साहेब राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पशुसंवर्धन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे पशुसंवर्धन आयुक्त पुणे मा जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ पशुसंवर्धन उपायुक्त यवतमाळ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहे हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी परसराम भाऊ डवरे माजी जिल्हा परिषद सदस्य, अविनाश भोजू राठोड, संजय मदन आडे, शेषराव वायकुळे, अंकुश नामदेव जाधव, निशिकांत राऊत, मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुंभकर्ण शासनाला जाग करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विभागीय कार्यालयावर एल्गार आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ जाधव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
