घुग्घूस येथील मृतक कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेवून केली मदत
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (१९ ऑगस्ट) : घूग्घूस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या मृतक सूरज माने व त्यांच्या पत्नी रत्नमाला माने यांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी आज घुग्घूस येथे भेट घेतली असून, आर्थिक मदत केली आहे.
यावेळी सदरहु प्रकरणा बाबत आ. जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशीही दुरध्वनी वरून चर्चा केली. सुरेश माने व रत्नमाला माने या दाम्पत्यांचा (१७ ऑगस्ट) ला मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. त्यानंतर घुग्घूस शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी परिस्थिती पाहता ही हत्त्या असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जात मृतकच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी, याकरीता चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. काही असामाजिक तत्वांकडून परिसरातील नागरिकांसह मृतकांच्या कुटुंबियांना भीती असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. घुग्घूस येथे जाऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले.
उपराेक्त कुटुंबियांना घाबरण्याची गरज नाही. या प्रकरणाची योग्य चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल. यावेळी आ. जोरगेवार यांनी आशवस्त करत सदरहू कुटुंबाला आर्थिक मदत केली. तसेच अनाथ मुलांचा योग्य रित्या सांभाळ करता यावा, करिता मृतकाच्या वडिलांना नगर परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीवर नौकरी देण्याबाबतही आ. जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.