सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१९ ऑगस्ट) : पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमानेच नंतर पतीला शिवीगाळ करित लाकडी दंडुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना काल १८ ऑगष्टला रात्री ८ वाजता तालुक्यातील बोर्डा या गावात घडली. मारहाणीची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बोर्डा या गावात रहात असलेल्या सुरेश भुराजी कोटनाके (४०) याचे त्याच्या पत्नी सोबत कडाक्याचे भांडण सुरु होते. दोघांमधील भांडण मिटविण्याकरिता गावातीलच नंदकिशोर दत्तात्रेय जळेकर (४०) या व्यक्तीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण मध्यस्थी करणाऱ्यालाच सुरेश कोटनाके याने डिचवल्याने त्याचा चांगलाच पारा वाढला. नंतर त्या दोघांमध्येच शाब्दिक चकमक उडाली. पती पत्नीचे भांडण दूर राहिले व त्या दोघांमधीलच वाद विकोपाला गेला. मध्यस्थी करणाऱ्या नंदकिशोर जळेकर याला सुरेश कोटनाके याने तो जंगलातून आणत असलेल्या लाकडांविषयी वनविभागाला माहिती देणार असल्याचे म्हणताच नंदकिशोर जळेकर हा आणखीच चिडला, व त्याने सुरेश कोटनाके याला शिवीगाळ करित लाकडी दांडुक्याने बेदम मारहाण केली. यात त्याच्या हाताच्या पंजाला जबर दुखापत झाली. सुरेश कोटनाके याने झालेल्या मारहाणीची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नंदकिशोर दत्तात्रेय जळेकर याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास जमादार अनंत इरपाते करित आहे.
भांडणात मध्यस्थी करणाऱ्यानेच केली बेदम मारहाण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
