लालगुडा येथे झालेल्या त्रिकोणी अपघातात टळला मोठा अनर्थ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१५ ऑगस्ट) : भरधाव ट्रकने दोन चार चाकी वाहनानांना जोरदार धडक देऊन ट्रक दुभाजक लांघून रोडखाली उतरला. सुदैवाने रोडच्या आसपास घरे नसल्याने मोठा अनर्थ टळला. वणीकडे भरधाव येत असलेल्या ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने आधी करला व नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिक-अप वाहनाला जबर धडक दिली. दोन्ही चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पिक-अप मधील तीन व्यक्ती जख्मी झाले आहे. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. हा त्रिकोणी अपघात आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस राज्य महामार्गावरील लालगुडा या गावाजवळ झाला. हा विचित्र व अंगावर शहरे आणणारा अपघात बघता मोठी दुर्घटना घडल्याचे दिसून येत होते. पण नशीब बलवत्तर म्हणून कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. तीन जण किरकोळ जख्मी झाले आहेत. 
वणी घुग्गुस मार्गावरील लालगुडा गावाजवळ विचित्र त्रिकोणी अपघात झाला. नारंडा येथील एका कंपनीमध्ये कोळसा खाली करून वणीकडे भरधाव येत असलेल्या ट्रकने दोन चार चाकी वाहनांना जोरदार धडक दिली. ट्रक चालकाचे ट्रक वरिल नियंत्रण सुटल्याने त्याने आधी घुग्गुस वरून वनीकडे येणाऱ्या MH ३४ BR ८६८८ क्रमांकाच्या कारला धडक देत रोडचे दुभाजक पार करून वणी वरून उकणीला जात असलेल्या MH ४० Y ८१६३ या पिक-अप वाहनाला जोरदार धडक दिली. कार मधील एअर बलूनमुळे कारमध्ये बसलेल्यांना दुखापत झाली नसली तरी कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. कारला धडक दिल्यानंतर ट्रक चालकाने राज्य महामार्गावरील दुभाजक पार करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक देत पिकअप वाहनासह ट्रकही रोडच्या खाली उतरला. पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीची ही पिकअप उकणीला जात होती. पिकअपचेही मोठे नुकसान झाले असून पिकअप मधील तीन जण जख्मी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. लालपुलिया येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अटॅच मध्ये चालणारा हा ट्रक वणी यवतमाळ मार्गावरील एका बॉडी वर्कशॉप धारकाचा असल्याचे समजते. लालपुलिया येथील कोलडेपो मधून कोळसा भरून नारंडा येथील कंपनीत कोळसा खाली करून हा ट्रक वणीकडे भरधाव येत होता. अशातच कार समोर आल्याने ट्रक चालकाचे ट्रक वरिल नियंत्रण सुटले व त्याने कारला धडक देत डिव्हायडर लांघून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपलाही जोरदार धडक दिली. या त्रिकोणी अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून तीन व्यक्ती मात्र किरकोळ जख्मी झाले आहेत. तर दोन्ही चारचाकी वाहन क्षतिग्रस्त झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
पुढील तपास पोलिस करित आहे.
लालगुडा येथे झालेल्या त्रिकोणी अपघातात टळला मोठा अनर्थ लालगुडा येथे झालेल्या त्रिकोणी अपघातात टळला मोठा अनर्थ Reviewed by सह्याद्री चौफेर on August 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.