टॉप बातम्या

विविध मागण्यासाठी फासेपारधी समाजाचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१५ ऑगस्ट) : बिलोली तहसिल कार्यालयासमोर फासे-पारधी समाजाचे विविध मागण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी अमरण उपोषणाला बसावे लागले आहे.
भारताने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले असुन देखील फासेपारधी समाजाला आजही आपल्या मुलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.
हि खुप मोठी शोकांतिका आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्वांना समान अधिकार आहेत. पण आजही काही उपेक्षित समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येऊन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही आमरण उपोषणाला बसण्याची गरज भासली आहे. 
याचे गांभीर्य लक्षात घेऊन बिलोली येथील प्रशासनाने याकडे स्वतः लक्ष देऊन उपेक्षित समाजातील नागरिकांना सोय सुविधा उपलब्ध करून द्यावेत.
 त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहे.

पारधी समाजाचे सर्वेक्षण करुन प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत जागे सहीत घरकुल उपलब्ध करुन देण्यात यावीत, समाजाला रोजगार हमी योजना/मनरेगा उपजिवीकेसाठी जॉब कार्ड उपलब्ध करुन द्यावे, पारधी वस्ती मध्ये अंगणवाडी मंजुर करणे, बँकेकडून लोन उपलब्ध करणे, आदी मागण्याच्या संदर्भात उपोषणास सोन्या केशव चव्हाण व पारधी समाज बसले आहे. त्या उपोषणाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते पाशाभाई गादिवाले यांनी केले आहे.

यावेळी उपोषणास सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज, एम.आय.एम चे बिलोली तालुकाध्यक्ष साजीद कुरेशी, ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे ए.जी. कुरेशी, शिवसेनेचे विधानसभा संघटक शंकर मावलगे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धम्मदिप गावंडे, मुकींदर कुडके, सय्यद फिरदोस आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
Previous Post Next Post