सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१५ ऑगस्ट) : तालुक्यातील नरसाळा ग्रामपंचायत कार्यालयात आज रोजी ७५ वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. येथील सरपंच संगीत मरसकोल्हे यांनी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना हार अर्पण करून ध्वजारोहण केलेत. उपस्थित सर्वांनी राष्ट्र गीत घेवून आरोग्य सेवक कोलुरी साहेबांनी धूम्रपान या बद्दल शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाला गावाचे सरपंच संगीत मरस्कोल्हे, उपसरपंच यादवराव पांडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. शारदा पांडे, सौ.पुष्पाताई भुसारी, ग्रामपंचायत सदस्य धनंजय तोडासे, येथील तलाठी थिटे साहेब, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक गण, गावाचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जून तोडासे व सामाजिक कार्यकर्ते संजय भुसारी, अंगणवाडी सेविका भारती खाडे, सविता गोवर्धन, रायपुरे सर्व अंगणवाडी मदतनीस आरोग्य सेविका गीता कुळमेथे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज दुर्गे व ग्रामपंचायत कर्मचारी मारोती कोहळे गोपाळ उईके आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी उपस्थीत होते.
नरसाळा ग्रामपंचायतमध्ये अमृत महोत्सव ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 15, 2021
Rating:
