सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी, (०३ ऑगस्ट) : तालुक्यातील मुरधोनी गावचे सेवा निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.मारोती गोसावी बिनगुले यांचे दि.३० जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले ते सत्यांशी वर्षाचे होते जिल्हा परिषद शिक्षक ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक असा त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून शिकून उच्च पदावर गेले. उत्कृष्ट अध्यापन पद्धती ही त्यांची ओळख होती तसेच ते इंग्रजी विषयांचे शिक्षक होते.
घाटंजी पंचायत समिती मधून ते शेवटी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले काही दिवसापासून ते आजारी होते. शेवटी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या मागे तीन मुली एक मुलगा जावई नातवंडे नातजावई असा बराच मोठा परिवार आहे.
सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री.मारोती बिनगुले यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2021
Rating:
